maharashtra

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी


Allocation of portfolios of Mahayuti finally announced, Fadnavis again as Home Minister and Ajit Pawar as Finance Minister; Read the complete list of 39 ministers
Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Debendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.  5 फेब्रुवारीला त्यांचा शपथविधी पार पडला. यानंतर 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. पण त्यानंतर सर्वांना अपेक्षा असलेलं खातेवाटप मात्र लांबत चाललं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या आधी तरी खातेवाटप होईल अशी आशा होती. मात्र खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.  

कोणाकडे कोणतं खातं? 

1) देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण 
3) अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन 
4) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 
5) राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे) 
6) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री 
8) गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण) 
9) गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता 
10) गणेश नाईक - वनमंत्री 
11) दादा भुसे - शालेय शिक्षण

12) संजय राठोड - जलसंधारण 

 

13) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा 
14) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास 
15) उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा 
16) जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल 
17) पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा