छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजांतर्फे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजांतर्फे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
बारा मावळा तर्फे ऐतिहासिक सरदार घराण्यातील रवींद्र कंक, बाळासाहेब सणस, अमोल सणस, गोरख देशमुख, अनिकेत बांदल, इंद्रजित जेधे, संदीप पोतनीस, चंद्रशेखर बर्गे, मारुती गोळे आदींनी उपस्थित राहून पाठींबा दिला.
यावेळी उदयनराजे म्हणाले, पृथ्वीतलावर शिवाजी महाराज पुरोगामी विचाराचे राजे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवरायांचा आदर्श घेऊनच राज्यघटनेची निर्मिती केली. सध्याच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणून राज्यकारभार करत आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे.