maharashtra

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी मोठी अपडेट, 'गाभाऱ्यातील प्राचीन शिळा...'


A big update for the devotees of Kulswamini Tuljabhavani of Maharashtra, 'Ancient Shila from Gabhara...'
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

Tulja Bhavani Temple: महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यत महत्वाची अपडेट आहे.  तुळजाभवानी देवस्थानाला महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. दरम्यान या मंदिराच्या गाभाऱ्यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये..गाभा-याच्या संवर्धनाच्या वेळी  गाभा-यातील चार शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजी बुवा यांनी निदर्शनास आणून दिली.. तडे गेलेल्या या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगीतलंय. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी

तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते. हे देवस्थान धाराशिव जिल्ह्यात वसलेले आहे. तुम्हाला येथे जायचे असल्यास चे सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. 

छत्रपतींची कुलदेवता 

स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. तुळजा या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती असून मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन आणि पुरोहिताचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.