Raj Thackeray: निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका; राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरचं आपलं मौन सोडलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. तर महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला होता. निवडणुकीनंतर त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी मेळावा घेतला यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला भेटताय मी तुम्हाला भेटतोय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची मी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यात मी काय बोललो नव्हतो. पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असा नाही. सर्व गोष्टींचा विवेचन सुरू होतं आकलन सुरू होतं. बरीच लोक मला भेटली. गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक लोक भेटायला आली. निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता ज्या प्रकारचा मिरवणुका जल्लोष पाहिजे होता त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता. हे काय झालं कसं झालं असा कसा निर्णय आला, माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही.त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं उदाहरण आहे. काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही, असा पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राजू पाटलांना त्यांच्या गावात झिरो मतदान
राजू पाटलांचा एक गाव आहे तिथे त्या पाटलांनाच मतदान होतं. साधारण बाराशे ते पंधराशे लोकांचा गाव आहे. त्या चौदाशे लोकांच्या गावांमध्ये राजू पाटलांना किती मत पडले असतील. अख्ख सगळं मतदान राजू पाटला नव्हतं त्यांचे भाऊ उभे होते त्यांना मतदान झालं होतं राजू पाटील उभे होते तेव्हा त्यांना मतदान झालं होतं जेव्हा ते खासदारकीला उभे होते तेव्हा देखील तिथे मतदान झालं मात्र यावेळी त्या गावातून राजू पाटलांना एक पण मत पडलं नाही. अख्या गावातून एकही मतदान पडत नाही जी चौदाशे मतं आहेत ती दरवेळी राजू पाटलांना पाडायची त्या गावात एक मत नाही पडत असं म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या बाबत संशय व्यक्त केला आहे. मराठवाड्याचा एक नगरसेवक आहे. नगरसेवक झाला त्यावेळी त्याला 5500 मतदान त्याच्या भागात झाले होते, आता त्यांना विधानसभा निवडणुकीला 2500 मतदान झालं, अशी माहिती देखील राज ठाकरेंनी दिली आहे. तर विधानसभा निवडणुकीत अनेक असे नेते आहेच. त्यांना विश्वास बसत नाही. निवडून आलेल्यांना बसत नाही. विश्वास बायकोला चिमटा काढ म्हणातात, असं म्हणत त्यांनी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.