maharashtra

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू; झेन सदावर्तेची महिला आयोगाकडे तक्रार


Dress code enforced at Siddhivinayak temple; Zen Sadavarta's complaint to the Women's Commission
सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहेय. या निर्णयाविरोधात वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्तेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

Siddhivinayak Temple Dress Code : महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. अशातच मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ड्रेसकोडनुसार कपडे परिधान केलेले नसतील तर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या या निर्णयााल वकिल गुणरत्न सदावर्तें यांची मुलगी झेन सदावर्ते हिने विरोध दर्शवला आहे. झेन सदावर्तेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे. तसेच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे. तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिद्धीविनायक मंदिरातील ड्रेसकोड निर्णयाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. झेन सदावर्ते हिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.  सिद्धिविनायक संस्थानाने मंदीरात येताना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेशबंदी असणार असल्याचा निर्णय घेतलाय. या  निर्णयाविरोधात झेन सदावर्तेने हिला आयोगाकडे तक्रार केली आहे. 

रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघानं हा निर्णय घेतलाय. राज्यात आतापर्यंत तब्बल 232 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आलीय. 

छत्रपती संभाजीनगरमधील 20 मंदिरात लवकरच ड्रेसकोड लागू होण्याची शक्यताय. शहरातील 20 मंदिरात ड्रेसकोड नियमावलीचे फलक लावण्यात आलीय. माहेश्वरी महिला मंडळाच्यावतीने हे फलक लावण्यात आलेयत. राज्यातील अनेक ठिकाणी ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. तर याला काही ठिकाणी पाठींबा मिळत असल्यानं शहरांतील काही मंदिरात ही फलकबाजी करण्यात आली आहे.