महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास!

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारातातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याच महामार्गाला टक्कर देणार देशातील दुसरा मोठा महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.
1350 KM लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला टक्कर देण्यासाठी भारतात आणखी एक मोठा महामार्ग उभारला जात आहे. सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहे (India's Second Longest Expressway) . हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत देशभरातील 550 जिल्ह्यांमध्येअंदाजे 65 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे तयार केले जात आहे. यामध्ये, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरला आहे. या महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. 1350 किमी लांबीचा हा मार्ग सात राज्यांना जोडणारा आहे. सध्या मध्यप्रदेशातील 245 किमी मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. देश-विदेशात दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची चर्चा आहे. त्यातच आता भारतात दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे उभारला जात आहे.