sports

टीम इंडिया अडकली ऑस्ट्रेलियात! 3 दिवसांत सिडनी कसोटी संपल्यानंतर भारतीय संघासोबत नक्की काय घडलं?


Team India stuck in Australia! What exactly happened to the Indian team after the Sydney Test ended in 3 days?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना सिडनी येथे खेळला गेला.

Team India stuck in Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना सिडनी येथे खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशीच हा सामना जिंकून मालिका 3-1 अशी खिशात घातली. टीम इंडियाला 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला पराभव पत्करावा लागला आणि सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल खेळण्याच्या स्वप्नांचाही चुराडा झाला. सिडनी कसोटी अवघ्या 3 दिवसांत टीम इंडियाला पराभवचा सामना करावा लागला. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात अडकली आहे. टीम इंडियाला अद्याप भारतात परतण्याचे तिकीट मिळालेले नाही. 

खरंतर, सिडनी कसोटी 2 दिवस आधी संपली. त्यामुळे टीम इंडियाला सध्या ऑस्ट्रेलियातच राहावे लागणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा 7 जानेवारीपर्यंत होता. ज्यामुळे सध्या तिकीट मिळण्यास विलंब होत आहे. दुसरीकडे, बीसीसीआय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी तिकिटांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 दिवसांत कसोटी संपल्याने भारतीय खेळाडूंना घरी जाण्यासाठी तिकिट मिळवताना पळापळ करावी लागत आहे. नियोजित तारखेनुसार टीम इंडियाला 8 जानेवारीला फ्लाइट घ्यायचे होते. परंतु सिडनी सामना 2 दिवस आधी संपल्यामुळे काही खेळाडू लवकर निघू शकले असते, पण त्यांना तिकिटे मिळाले नाही. 

भारत WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर

सिडनी कसोटीत टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर पडली. टीम इंडिया WTC फायनलमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी दोन्ही वेळा भारतीय संघ डब्ल्यूटीसी फायनल खेळला होता, मात्र दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.