sports

आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाला प्रथमच जेतेपद

फलटणच्या व्हॉलीबॉलपट्टू धीरज दळवीचा विजयात मोलाचा वाटा

Indian team wins international volleyball tournament for the first time
डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ विदेशात सहभागी झाला होता. त्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या कॅनडाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय व्हॉलीबॉल संघाने अंतिम टांझानिया संघासोबत झालेल्या लढतीत दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

फलटण : दुबई येथे 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ विदेशात सहभागी झाला होता. त्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी राहिलेल्या कॅनडाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय व्हॉलीबॉल संघाने अंतिम टांझानिया संघासोबत झालेल्या लढतीत दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयात फलटण तालुक्यातील सासकलचा व्हॉलीबॉलपट्टू धीरज दळवीचा मोलाचा वाटा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटण तालुक्याचा डंका वाजला आहे.
‘मॅन ऑफ द सीरिज’ म्हणून उत्कृष्ट शूटर बीड जिल्ह्यातील बाभूळगावचे फुलचंदराव वाघ यांची निवड करण्यात आली. या विजयात संघाचे कॅप्टन बिपीन चहल, व्हाइस कॅप्टन अंकुश पाठक, ओंकार, अंकुर, बिरज मलिक, फुलचंद शोएब बेगमपूर, धीरज दळवी, चिंतन, वासू, हेमा व शुभांगी या सर्वांचा समावेश होता. अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर ‘जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी जोरदार घोषणाबाजी करत दुबईतील भारतीय व्हॉलीबॉल प्रेमींसह खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
या विजयाबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती विश्‍वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विशाल, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल युवा मंचचे जितेंद्र सर, दत्तात्रय डांगे, सासकल जनआंदोलन समिती, शाळा सुधार संघटन, ग्रामपंचायत सासकल, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल यांनी सर्व संघ सदस्यांचे अभिनंदन केले.  
फलटणच्या धीरज दळवीची उत्तुंग कामगिरी
टांझानिया संघाचा दारुण फरभव करत भारतीय संघाने बाजी मारत व्हॉलीबॉलच्या इतिहासात प्रथम अशी गोष्ट भारतीय संघाने केली आहे आणि ही गोष्ट वाखणण्याजोगी असून याची नोंद जगाने घेतली आहे. या भारतीय संघात फलटण तालुक्यातील सासकल गावचे सुपुत्र उत्कृष्ट नेटमन धीरज ऊर्फ धैर्यशील दत्तात्रय दळवी यांचा समावेश होता. या ऐतिहासिक विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याच्या कामगिरीने सासकलसह फलटण तालुक्याचा डंका आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला आहे.