
*वाठार स्टेशन येथे आरोग्य तपासणी महामेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद*
उच्चशिक्षित तज्ञ डॉ विश्वनाथ चव्हाण सरांच्या दूरदृष्टीतून उत्तर कोरेगाव परिसराला नवा आरोग्याचा शिलेदार मिळाला. त्यांच्या वैचारीक प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा अवलंब या तत्वावर महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध बाजारपेठ वाठार स्टेशन आणि परिसरातील नुकताच १५ गावांचे एकत्रित शिबिर श्री वागदेव विद्यालयात भव्य आरोग्य महामेळावा संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण सर (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डिप्लोमा इन इकार्डियोग्राफी) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला ज्यामुळे परिसरातील अनेक गरजूंना आरोग्य संजीवनी देण्याचे काम केले. या महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. हृदयविकार, डायबिटीस, वाढलेला रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. इतर तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळाली.
आरोग्य महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण सर म्हणाले, "आता उत्तर कोरेगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या टीमचे परम कर्तव्य आहे. मौजे चव्हाणवाडी (फलटण) हे जसे माझे गाव आहे तसेच येथील मौजे विखळे हे सुद्धा मी माझेच गाव समजतो कारण ते माझ्या वडिलांचे आजोळ आहे. भविष्यातही असे आरोग्य महामेळावे श्री समर्थ वागदेव महाराजांच्या पावनभूमीत आयोजित करून तळागाळातील गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नागरिकांनी आता आपल्या आजारांपासून स्वतःला मुक्त करून शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनून नवी पिढी घडवायची आहे."
आरोग्य महामेळाव्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी डॉ. चव्हाण सर आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले. "अशा आरोग्य महामेळाव्यांमुळे आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते.
आरोग्य महामेळाव्यात सुप्रसिद्ध वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव मॅडम (आदित्य हॉस्पिटल, पोवई नाका, सातारा) यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी ६५% सवलतीत पॅप स्मिअर तपासणीची सुविधा दिली. मात्र महिलांचा सहभाग आणखी वाढवता आला असता असे त्यांनी सांगितले. महिलांनी आता गर्भाशय संबंधित समस्यांना आपल्या तज्ञांशी सल्लामसलत करून निवारण करायचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ. अण्णासाहेब कदम सर (कदम स्कीन क्लिनिक) यांनी नागरिकांना अशा आरोग्य महामेळाव्यात सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले जेणेकरून आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच त्यांना वेळीच रोखता येईल. डॉ. चव्हाण सर यांच्या दूरदृष्टीमुळे उत्तर कोरेगाव परिसरातील लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडेल असे त्यांनी नमूद केले. तसेच त्वचा रोग व केसांच्या निगडीत आजारांपासून मुक्त होण्याकरिता सातारा जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञान कदम स्कीन क्लिनिक येथे उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी सवलतीत जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा असे आवाहन केले.
आरोग्य महामेळाव्याचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंच सौ. सीमा गणेश चव्हाण आणि आदरणीय आदर्श व्यक्तिमत्त्व श्री. गणेश चव्हाण, श्री. महेश गांधी, श्री. अभिजीत निकम यांनी तज्ञांसह दीपप्रज्वलन करून केले. वाठार स्टेशन सहित देऊर, तडवळे, विखळे, पिंपोडे, राऊतवाडी, बिचुकले, आदर्की, तळिये, दहिगाव, नलवडेवाडी, रणदुल्लाबाद, करंजखोप, सोळशी, नांदवळ, जाधववाडी आणि सं.वाघोली या परिसरातील काही नागरिकांनी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची तपासणी केली.