sports

एकनाथ ओंबळे गावागावांत करताहेत कोरोनाबाबत जनजागृती


जावळी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

केळघर : जावळी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

आज शिवसेना सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिवसभर कोरोनाबाबत जनजागृती केली. आज दिवसभर गाडीवर ध्वनिक्षेपक लावून बोंडारवाडी ते मेढा दरम्यान गावागावात जाऊन त्यांनी जनजागृती केली.

कोरोना हाताबाहेर जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्बंधांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, बाजारपेठेत निष्कारण गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सचा अवलंब करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, असे आवाहनही त्यांनी केले. जावळी तालुका हा ऐतिहासिक असून, सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ ओंबळे यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या अनोख्या जनजागृतीचे कौतुक होत आहे.