जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.
जावली : जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.
डॉ. पाटणकर म्हणाले, पाणी नाही कोण म्हणतो, त्याला माझ्याकडे पाठवा. या ५४ गावांना पाणी मिळणार नाही, असे कोण म्हणते, तुम्ही लढायला शिका पाणी आपोआप तुम्हाला मिळेल. बँकेने मोरावळे ते इतर गावे अशा गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाणी न उचलता बोजा चढवला त्या लढ्यात मी सुध्दा सहभागी होऊन संबधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे आज अखेर त्यांच्या शेतीवर कोणीही जप्ती आणू शकत नाही किंवा शासन त्यांच्यावर काहीही कारवाई करू शकत नाही, कारण त्यांचा लढा योग्यच आहे. तसे बोंडारवाडी धरणासाठी तुम्ही किती दिवस तुम्ही माझ्याबर राहणार.
मुंबईला आझाद मैदानावर बेमुदत संप करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहणार का? कारण ज्यांनी फसवले नाही त्यांचा लढा यशस्वी झाला, फसवले त्यांचा नाही झाला. लवाद, मंजूरी वगैर काही नाही तुम्हाला वर्षाला जेवढे पाणी पाहिजे ते आहेच, कशाला मंजूरी पाहीजे. पाणी ५४०० घनमीटर आहे. १ लाख ५० हजार ९०० लोकांना पाणी मिळणार आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही देशाचे निर्माते आहोत, कष्टकरी आहोत. महाबळेश्वर जावली तालुक्यात पावसाच्या भरवशावर एक पीक खायला मिळते. गेली १२१ वर्ष माथाडी हमाली काम करतायत त्यांसाठी ही चळवळ आहे. लहानपणापासून चळवळीत आहे. महात्मा फुले यांचेकडून शेतकऱ्यांसाठी लढायला शिकलो आहे. त्यामुळे सर्वांची एकजुट लढा यशस्वी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
प्रास्ताविकात विजयराव मोकाशी म्हणाले, बोंडारवाडी धरणाच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी मिळावण्यासाठी मागणी करण्यात आली. श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांनी धरणाची मागणी २ टीएमसी केली व त्याला तत्वता मान्यता १.३७ टीएमसी मिळाली, परंतू ही मागणी पुन्हा रद्द होवून १ टीएमसीची तत्वता मान्यता दिली. लवादमध्ये पाणी शिल्लक नाही, त्यामुळे ०.७३ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. पण ट्रायलपीटसाठी बोंडारवाडी ग्रामस्थांनी विरोध केला. मुळरेषा बदलून ११०० मीटर आत धरण घेतल्याने त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिले. परंतू त्याच्यावर काही निर्णय घेण्यात आला नाही. डॉ. भारत पाटणकर यांनी आम्हाला मार्गदर्शन करून बोंडारवाडी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ५४ गावच्या लोकांना सहकार्य करावे.
विजयराव मोकाशी पुढे म्हणाले, नियोजित धरण हे मूळ धरण रेषेवर करावे, अशी कृती समितीची मुख्य मागणी असून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरण शासनाने करावे, याबाबतही कृती समितीने आग्रही भूमिका घेतली असून धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कृती समिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५४ गावांनी आतापर्यंत साथ दिली असून यापुढेही अशीच साथ द्यावी, असे आवाहन केले.
मेढा येथील कलश मंगल कार्यालयात बोंडारवाडी धरण कृती समिती व श्रमिक मुक्ती दल यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती बापूराव पार्टे, शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, संचालक आनंदराव सपकाळ, शांताराम आंग्रे, राजेंद्र धनावडे, विजयराव सावले, विनोद शिंगटे, आदिनाथ ओंबळे, उषा उंबरकर, भाऊसाहेब उभे, सखाराम सुर्वे, आनंदराव जुनघरे, दत्ता बेलोशे, सुरेश जाधव, संजय गाडे, नारायण सुर्वे, मंदाकिनी भिलारे, सुधा चिकणे, आतिष कदम, बजरंग चौधरी,या मेळाव्याला ५४ गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला, युवक, मुंबईकर, पुणे स्थित उद्योजक आदि मान्यवर उपस्थित होते. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले तर आदीनाथ ओंबळे यांनी आभार मानले.