महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.
जावली : महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनुसार व जावळी तालुकाध्यक्ष एस. ए.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे व कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांच्या नेतुत्वाखाली मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच निदर्शनेही करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी आज मेढा येथील तहसील कार्यालयासमोर तालुका तलाठी संघटनेच्यावतीने एक दिवसीय आंदोलन करून काम बंद ठेवण्यात आले. रामदास जगताप यांची यावेळी तातडीने बदली झाली नाही तर 13 ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी तहसीलदार राजेंद्र पोळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या आंदोलनामध्ये माजी उपाध्यक्ष आर. बी. जाधव, मंडल अधिकारी प्रतिनिधी ए. आर. शेख, एस. व्ही. मुळीक, सल्लागार पी. डी. गाढवे, महिला प्रतिनिधी पी. आर. पराड, उपाध्यक्ष एम. पी. सुतार व संगीता माने इतर पदाधिकारी व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस डी. एन. आंबवणे म्हणाले, प्रशासनाने व शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, आम्ही दिलेल्या निवेदनाची कार्यवाही व्हावी अन्यथा निवेदनात दिल्याप्रमाणे येत्या १३ ऑक्टोंबर पासून सर्व तलाठ्यांचे काम बंद ठेवण्यात येईल.
कार्याध्यक्ष एस. व्ही. ढाकणे यांनीही निवेदनाची शासनाने दखल घेवून कारवाई करण्याची मागणी केली व आंदोलना साठी उपस्थित असलेल्या संघटनेच्या सर्व सभासदांचे कार्याध्यक्ष एस व्ही ढाकणे यांनी आभार मानले.