maharashtra

मेढा येथे 2 लाख 19 हजाराचा गुटखा जप्त


गवडी, ता. जावली गावाच्या हद्दीमध्ये बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुटखा व पान मसाला विक्री करताना मेढा पोलीसांनी कारवाई करत २ लाख १९ हजार १०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सातारा : गवडी, ता. जावली गावाच्या हद्दीमध्ये बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुटखा व पान मसाला विक्री करताना मेढा पोलीसांनी कारवाई करत २ लाख १९ हजार १०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकाराबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सातारा अनिल पवार यांनी मेढा पोलीस स्टेशन फिर्याद दिली असून समद अक्तार पठाण वय २८ वर्ष रा .सातारा, शंकर मधूकर मोरे वय ३२ रा .पाचवड यांच्या विरोधात महाराष्ट्र शासन उत्पादन विक्री व वहातुक व साठा करण्यासाठी प्रतिबंध केलेल्या विविध प्रकारचे ब्रॅण्ड पान मसाला, सुंगधी तंबाखु विक्री हेतु साठा केला असल्यामुळे गुन्हा दाखल करून मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. यामध्ये अॅव्हेंजर गाडी क्र. MH-11-CC-1777 व अॅक्टिव्हा MH-11-DF-6015 या दोन गाडयांसह दोन लाख एकोणीस हजार शंभर रूपयाचा मुद्देमाल जप्त कर०यात आला आहे . ही कारवाई स. पो. नि. अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ह. जाधव करीत आहेत.