अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास प्रदीप मधुकर शिंदे रा. सोनगाव ता. जावली याने त्याच्या ताब्यातील होंडा होर्नेट दुचाकी क्रमांक 99 18 ही भरधाव वेगाने तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे चालवून श्रेयस बाळू शिंदे वय 20 रा. सोनगाव, ता. जावली यांच्या दुचाकीस क्रमांक एम एच 11 झेड 50 37 जोरदार धडक देऊन श्रेयस बाळू शिंदे आणि दुचाकीच्या पाठीमागे बसलेला गणेश काटकर यांना जखमी केले. या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस नाईक आर. टी. शेख अधिक तपास करीत आहेत.