कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
सातारा : कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी किशोर शिवाजी वारागडे वय 28 राहणार कुडाळ, जावेद बालमनेर वय 40 राहणार कुडाळ, धर्म बंडू भानसे वय 60 राहणार गोसावी वस्ती तालुका जावळी, सुनील बाळू मेंगळे गोसावी वस्ती तालुका जावळी, प्रशांत पवार वय 38 गुजरवाडी पोस्ट सोनगाव, ऋषिकेश राजेंद्र वंजारी 24 भोईवाडी कुडाळ, सागर हनुमंत जाधव राहणार उडतरे या सर्वांविरोधात सीआरपीसी 41 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांच्या या कारवाईमध्ये 51 हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मेढा पोलिसांना मंदिरासमोर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.