दुर्गम कांदाटी खोर्यातील पिंपरी तर्फ तांब गावच्या एकता जाधव यांची प्रसूती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी बोटीमध्येच यशस्वी केली.
जावळी तालुक्यात आज नव्याने 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधितांमध्ये कावडी 10, करंजे 2, करंदी 5, हातगेघर 1, आर्डे 1, कुडाळ 5, म्हसवे 1, पिपळी 1 करहर 2 असे एकूण 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.
‘कोरोना काळात सामाजिक भावना जोपासत वैद्यकीय सेवा बजावणार्या डॉक्टरांनी व नटराज युवक मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला असून, मंडळाचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे,’ असे मत सातारा-जावळीचे विद्यमान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
‘आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकरी मेळावा मार्गदर्शक ठरेल. याद्वारे शेतकर्यांना फायदा होईल,’ असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले.
जावळी तालुक्यात आज पुन्हा दुसर्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, घेवडा आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जावली तालुक्यातील मार्ली घाटात वीस दिवसांपूर्वी पुरुष जातीचा एक अज्ञात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. असे असतानाच आज त्याच जागेपासून काही अंतरावर दुसरा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. हा सिरीयल किलिंगचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत जनतेतून संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी (दि. 22) तब्बल 28 कोरोनाबाधितांची भर पडली असून, शुक्रवारी (दि. 21) 16 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. तर खासगी लॅबमध्ये दोघांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तालुक्यात तब्बल 44 कोरोनाबाधित आढळले असून, हे सर्व स्थानिक आहेत. एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.
जावळी तालुक्यामध्ये बामणोली, कास विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जावळी परिसरात बुधवारी गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जावलीत 786.91 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली होती.