जावलीत कोरोनाचा कहर सुरूच; दोन दिवसांत 44 बाधित
एकूण रुग्णसंख्या 614, मृत्यू 19, डिस्चार्ज 454, उपचाराखाली 141
जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी (दि. 22) तब्बल 28 कोरोनाबाधितांची भर पडली असून, शुक्रवारी (दि. 21) 16 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. तर खासगी लॅबमध्ये दोघांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तालुक्यात तब्बल 44 कोरोनाबाधित आढळले असून, हे सर्व स्थानिक आहेत. एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.
कुडाळ : जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी (दि. 22) तब्बल 28 कोरोनाबाधितांची भर पडली असून, शुक्रवारी (दि. 21) 16 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. तर खासगी लॅबमध्ये दोघांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तालुक्यात तब्बल 44 कोरोनाबाधित आढळले असून, हे सर्व स्थानिक आहेत. एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.
तालुक्यात दररोज स्वॅब व अँटीजेन टेस्टचे प्रमाण वाढवले त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. परंतु, त्यामुळे कोरोनाबाधितांना वेळीच शोधणे शक्य होत आहे. आता कोरोनाबाधित स्थानिक आढळत असल्याने लोकांनी तातडीच्या कामाशिवाय घरा बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरून कोरोनापासून स्वतः चे व कुटुंबाचे संरक्षण करावे. सर्दी, ताप खोकला यासह कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, प्रशासन या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.
आज पुणे येथील आयसीएमआर लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालात मेढा येथील 38 व 20 वर्षीय पुरूष, सरताळे-गणेशवाडी येथील 78, 35 वर्षीय महिला, 37, 24 वर्षीय पुरुष, 5, 10 वर्षीय बालिका, कुडाळ येथील 65, 50, 26, 15, 15 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, 8 वर्षीय बालक, रिटकवली येथील 11 वर्षीय महिला, 42, 23, 20, 35 वर्षीय पुरुष, बिभवी येथील 38, 20, 17 वर्षीय महिला, 15 वर्षीय पुरुष, अँटीजेन टेस्टमध्ये आज कोलेवाडी येथील 65, 7 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय महिला, कुसुंबी येथील 55 वर्षीय पुरुष यांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. याबरोबरच काल मेढा, कुडाळ व सायगाव येथे घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये चौदा जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.