44interruptedintwodays

esahas.com

जावलीत कोरोनाचा कहर सुरूच; दोन दिवसांत 44 बाधित

जावली तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी (दि. 22) तब्बल 28 कोरोनाबाधितांची भर पडली  असून, शुक्रवारी (दि. 21) 16 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. तर खासगी लॅबमध्ये दोघांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत तालुक्यात तब्बल 44 कोरोनाबाधित आढळले असून, हे सर्व स्थानिक आहेत. एकूणच तालुक्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला आता सुरुवात झाली आहे.