sports

जावळीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ

काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान

जावळी तालुक्यात आज पुन्हा दुसर्‍या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, घेवडा आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कुडाळ : जावळी तालुक्यात आज पुन्हा दुसर्‍या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले होते. अखेर दुपारी तीन वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये काढणीला आलेल्या भुईमूग, सोयाबीन, घेवडा आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

तसेच जावळी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा तडाखा खरीप हंगामातील पिकांना बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी उशिरा पेरणी झालेल्या पिकांसाठी हा परतीचा पाऊस फायदेशीर तर अगोदरच्या म्हणजे काढणीच्या पिकांना मारक असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलते जात आहे.