Jawali

esahas.com

मेढ्यात ‘महात्मा गांधी वाचनालया’तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये मेढा गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे अधिकारी, मेडिकल असोसिएशन मेढाचे सर्व सभासद, दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन  नुकताच सत्कार करण्यात आला.

esahas.com

गोरख चिंच वृक्षासमवेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढला सेल्फी

सातारा-पुणे महामार्गावर पाचवड हद्दीमध्ये असणार्‍या तीन शतके पूर्ण केलेला महाकाय गोरख चिंच या वृक्षाबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी काढत ‘झाडे वाचवा झाडे वाढवा’ असा संदेश दिला आहे. 

esahas.com

मेढा पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील

‘जावलीच्या खोर्‍यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने शत्रूशी दोन हात करीत स्वराज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज मेढा पोलिसांची कामगिरी देखील कौतुकास्पद असून कुख्यात गुंड गजा मारणे याला ज्या पद्धतीने पकडले तशीच कामगिरी करीत भविष्यात तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी यावर पोलिसांची करडी नजर राहून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील, यासाठी मेढा पोलीस कायम प्रयत्नशील राहतील,’ अशी आशा जयश्री गिरी यांनी व्यक्त केली. 

esahas.com

कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते

‘शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते; पण संपणार्‍या वाटेसोबत उगवणारी एक पहाट असते. खरा शिक्षक कोण असतो तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खर्‍या अर्थाने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो ते काम खर्‍या अर्थाने मधुकर सूर्यवंशी यांनी केले,’ असे गौरवोद्गार शिवव्याख्याते ह. भ. प. संतोष भांदिर्गे यांनी काढले.

esahas.com

महिलांमध्ये जागतिक क्रांती घडवण्याची ताकद

‘दैनंदिन जीवनामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी ठरल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे स्थान उत्तुंग भरारीने पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात या जगात क्रांती घडविण्याची ताकद महिलांमध्ये आहे,’ असा विश्‍वास जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला. 

esahas.com

जावली तालुक्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करावी

कुडाळ, मेढा, सायगाव, करहर, सोनगाव, सरताळे, हुमगाव, पानस, महू धरण परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू मटका व जुगार अड्डे  सुरू असल्यामुळे दारू सम्राट व मटका किंग व जुगार सम्राट अड्डेवाले मोकाट झाले आहेत. यांच्या अवैध दारू अड्ड्यांवर तत्काळ कारवाई करत अवैध धंदेवाल्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी व तडीपार करून जावळी तालुका दारूमुक्त, जुगारमुक्त आणि मटका मुक्त करावा, अशी मागणी जावळी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्याकड

esahas.com

उसाच्या ट्रॉलीला ओमनीची धडक

कुडाळ (ता. जावली) येथे पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणार्‍या उसाच्या ट्रॉलीला ओमनी कारने धडक देऊन झालेल्या अपघातात चारजण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटे हा अपघात झाला.

esahas.com

जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध

‘जावळी तालुक्यामधील ग्रामीण भागात विकासकामे पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत,’ असा विश्‍वास जावळी तालुका पंचायत समितीच्या विद्यमान सभापती जयश्रीताई गिरी यांनी व्यक्त केला.

esahas.com

निझरे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

esahas.com

छत्रपतींच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ माझ्याशी

‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्‍वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्‍वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया कोणाची हिंमत आहे त्या पुतळ्याच्या जवळ यायची,’ असा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.