sports

मेढ्यात ‘महात्मा गांधी वाचनालया’तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार


महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये मेढा गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे अधिकारी, मेडिकल असोसिएशन मेढाचे सर्व सभासद, दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन  नुकताच सत्कार करण्यात आला.

केळघर : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये मेढा गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे अधिकारी, मेडिकल असोसिएशन मेढाचे सर्व सभासद, दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन  नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी स्व. सावित्री थत्ते आदर्श महिला वाचक पुरस्कारप्रथम क्रमांक उषा दत्तात्रय कुलकर्णी, द्वितीय  रेखा राजेंद्र दळवी, तृतीय सुजाता अनिल माने अनुक्रमे यांना देऊन गौरव करण्यात आला. 

स्व. जनाबाई पार्टे आदर्शमाता पुरस्कार इंदुमती सुरेश पवार यांना देऊन गौरवण्यात आले. सी. आर. रंगनाथन आदर्श ग्रंथपाल पुरस्कार वर्षा प्रभाकर कोडगुले, सहायक ग्रंथपाल नगर वाचनालय सातारा यांना देऊन गौरवण्यात आले. स्व. शामराव क्षीरसागर गुरुजी आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार नंदा जाधव, प्रमुख कार्यवाह सातारा जिल्हा ग्रंथालय संघ सातारा  यांना देऊन गौरवण्यात आले. 

यावेळी विशेष अतिथी विशाल पवार यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच किसन साळुंखे पेंटर यांचा ‘जावली कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास कांतीभाई देशमुख, पांडुरंग जवळ बापू, बबनराव वारागडे, नारायण शिंगटे गुरुजी,  शिवाजीराव देशमुख, प्रकाश कदम, प्रितम शामराव क्षीरसागर, प्रियांका किरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख मान्यवरांचे स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश पार्टे यांनी केले.
उपस्थित कोरोना योद्ध्यांना पांडुरंग जवळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पांडुरंग जवळ यांनी मेढ्यातील सर्व डॉक्टरांनी दररोज एक रात्री थांबून मेढ्यातील रुग्णांना सेवा द्यावी, असा महत्त्वाची मागणी केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. रघुनाथ ठाणेदार, अंगणवाडी सेविका सुला पवार, नंदा जाधव यांनी वाचनालयाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शोभा शेडगे, संचालक विठ्ठल देशपांडे, अशोक दीक्षित, संचालिका स्वाती दीक्षित उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन सचिव धनंजय पवार यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल आबा जंगम, सहायक ग्रंथपाल आशा मगरे, लिपिक  इमताज शेख, माधवी कदम यांनी प्रयत्न केले.

नारायण शिंगटे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले.