खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ रोजी ६.३० ते दि. १८ रोजी ८.५ वाजण्याच्या सुमारास खंडाळा गावच्या हद्दीत एका रुग्णालयाजवळ पावसात रस्ता न दिसल्याने सुशीला श्रीरंग धायगुडे उर्फ सुशीला कोल्हटकर, वय ३०, रा. अहिरे, ता. खंडाळा ही महिला पाय घसरून विहिरीत पडून तिचा मृत्यू झाल्याची खबर अनिल नामदेव धायगुडे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली.


