बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली.
सातारा : बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२० रोजी ३.३० वाजण्याच्या सुमारास शिरवळ गावच्या हद्दीत गोलू राम संजीवन, वय १९, रा. वर्धमान गार्डन, कात्रज, पुणे हा बोअरवेल मशीनच्या ट्रकमधून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला प्रथम शिरवळ येथील जोगळेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तेथे उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी कात्रज येथील भारती हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. उदय कृष्णन यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली.