Khandala

esahas.com

खंडाळा येथे घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस

खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

शिरवळ येथे प्रेम प्रकरणातून सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण

शिरवळ, ता. खंडाळा येथे प्रेम प्रकरणातून एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

esahas.com

वाहनचोरी करणाऱ्या सराईतास शिरवळ पोलिसांच्या बेड्या

शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१३ ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी इको हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी राजकुमार भुजबळ, गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या चार दिवसांच्या आत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.

esahas.com

कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर

गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच म्हावशी ता. खंडाळा येथे शुक्रवारी रात्री भरधाव आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कारचालक मद्य प्राशन करून कार चालवत असल्याचे समोर आले असून त्याला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

esahas.com

खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

एका वैद्यकीय व्यवसायिकास खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

पक्षप्रतोद भरत गोगावले यांचा थेट शिरवळ मध्ये फोन

विधान सभेचे सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी शिरवळ येथे मोबाइल वरून शिरवळ येथील शिव सैनिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना मजबूत करण्यासाठी सहकार्य करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

esahas.com

कॉलेजच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तिघेजण निलंबित

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड अशा तिघांना निलंबित केले असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.

esahas.com

शिरवळमध्ये गोळी झाडून एकाचा खून

शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून झाला असल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

esahas.com

पाच हजार रुपये किमतीची ज्वारी चोरीस

गुठाळेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी शेतातून पाच हजार रुपये किमतीचे ज्वारीचे पीक लंपास केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात; एक ठार, सहा जखमी

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कॅनॉलजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे रा. सासवड, जि. पुणे हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिकेमधून खंडाळा रुग्णालयात पाठवले. दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले.