कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित एक महिन्यापासून फरार होते. संशयित तिघांकडून आठ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसनवीर बरोबर असलेला भागिदारी करार आठ दिवसात दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडुन आलेल्या सत्ताधाऱ्यांना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पञकार परिषेदत केले.
भाटघर, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल शिवाजी आवाळे रा. भोलावडे, ता. भोर याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पारगाव, ता. खंडाळा येथे सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७६५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्या करुन धुडगूस घालणार्या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
लोणंद शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून, सकाळची 7 ते 11 प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत चालू असणार्या दुकानांवर गर्दी होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही.
लोणंद येथील एका घरात भाडेकरू बनून राहत असलेल्या पती-पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक करत आपला पोलिसी हिसका दाखवला आहे.
‘सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. लोणंदच्या विकासासाठी जसे बाळासाहेब आग्रही असायचे त्याचप्रमाणे लोणंदकरांसाठी मी कायमच आग्रही असेण.
लोणंद येथे क्रांतिसंत श्री गुरू रविदास महाराज यांची जयंती लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात व श्री गुरू रविदास मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
लोणंद-नीरा रोडवर पाडेगाव जवळ भवानीमाता मंदिराजवळच्या तीव्र उतारावर दोन डंपरमधे झालेल्या भीषण अपघात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.