maharashtra

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा


One offense in a molestation case
भाटघर, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल शिवाजी आवाळे रा. भोलावडे, ता. भोर याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खंडाळा : भाटघर, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल शिवाजी आवाळे रा. भोलावडे, ता. भोर याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी 9.10 वा. सुमारास भाटघर गावच्या हद्दीत एक महिला वाढदिवस साजरा करीत होती. ती महिला व तिचे पती नातेवाईकांसमवेत फोटो काढीत असताना अनिल शिवाजी आवाळे हा तेथे आला. त्याने तिचा हात जबरदस्तीने धरुन मला तुझ्यासोबत सेल्फी काढायची आहे, असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.