maharashtra

जुगार अड्डयावर छापा

७६५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत

Raid on a gambling den
पारगाव, ता. खंडाळा येथे सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७६५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

खंडाळा : पारगाव, ता. खंडाळा येथे सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ७६५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारगाव गावच्या हद्दीत जनावरांच्या शासकीय दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच कृष्णा रामनाथ जाधव, वय ३० हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ७६५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.