maharashtra

पाच हजार रुपये किमतीची ज्वारी चोरीस


Sorghum worth five thousand rupees stolen
गुठाळेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी शेतातून पाच हजार रुपये किमतीचे ज्वारीचे पीक लंपास केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

खंडाळा : गुठाळेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी शेतातून पाच हजार रुपये किमतीचे ज्वारीचे पीक लंपास केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.६ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान गुठाळेवाडी येथील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाच हजार रुपये किमतीचे ज्वारीचे पीक चोरून नेल्याची तक्रार विकास कृष्णा महांगरे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.