maharashtra

खंडाळा येथे घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस


खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी १० ते दि. १० रोजी ७ वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील एम.एस.सी.बी कार्यालयाजवळ वास्तव्य करणारे अमित अशोक बामणे वय २६ यांच्या घरातून अज्ञात चोट्याने ३० हजार रुपये किमतीची दुचाकी,  १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप,  १ हजार रुपये किमतीचा मिनी होम थियटर,  ७ हजार रुपये किमतीच्या एलईडी असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.