maharashtra

वाहनचोरी करणाऱ्या सराईतास शिरवळ पोलिसांच्या बेड्या


शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१३ ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी इको हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी राजकुमार भुजबळ, गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या चार दिवसांच्या आत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.

खंडाळा : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमधून दि.१३ ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी इको हे वाहन चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांनी दिली होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांनी राजकुमार भुजबळ, गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या चोरीचा अतिशय कौशल्यपूर्ण असा तपास करत अवघ्या चार दिवसांच्या आत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अजयसिंग अर्जुनसिंग दुधनी वय २१ रा. ७२ वस्ती पाण्याची टाकी,मांजरी बु. हडपसर व बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड, वय २२, रा.श्रीसाई सोसायाटीसमोर बिराजदारनगर हडपसर,पुणे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याप्रकणी सदर वाहनाचा व आरोपींचा शोध सुरू असताना शिरवळ पोलिस स्टेशनचे डीबी पथकातील अधिकारी यांना सदर इको वाहन हे मांजरी बू. या ठिकाणी असल्याची  गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सतिश अंदेलवार, पो.ना.नितीन महांगरे, पो.कॉ. प्रशांत वाघमारे व मंगेश मोझर यांनी तेथील स्थानिक हडपसर पोलिस स्टेशनच्या मदतीने आरोपींना पकडण्यासाठी आपले जाळे लाऊन ठेवले होते. रात्रीच्या वेळी हे वाहन घेवून जाण्यासाठी हे आरोपी आले असता त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटक केल्यानंतर हे आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तसेच त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तब्बल ३३ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले.
सदर कामगिरी ही अजयकुमार बन्सल पोलिस अधीक्षक सातारा, अजित बोराडे अप्पर पोलिस अधीक्षक, तानाजी बरडे उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरिक्षक सतिश अंदेलवर पो.हवा.सचिन वीर यांच्याद्वारे करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार हे करत आहेत.