शिरवळ, ता. खंडाळा येथे प्रेम प्रकरणातून एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा : शिरवळ, ता. खंडाळा येथे प्रेम प्रकरणातून एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील एका महिलेने प्रेमप्रकरणातून आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केली असून त्यामध्ये त्या मुलाचा हात मोडला आहे. ती महिला एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्या मुलाच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके दिले असल्यामुळे अंगावर ठिकठिकाणी फोड येऊन त्याला जखमा झाल्या आहेत. ही घटना वैद्यकीय अधिकारी सुदर्शन गोरे यांच्या दक्षतेमुळे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. मात्र त्या महिलेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.


