maharashtra

शिरवळमध्ये गोळी झाडून एकाचा खून


Murder of one by shooting in Shirval
शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून झाला असल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

खंडाळा : शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून झाला असल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, शिरवळमधील एका अपार्टमेंटवरील टेरेसवर संजय पाटोळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निदर्शनास आले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी व एलसीबी पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा झाल्यानंतर मृताची ओळख पटली असून तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी पथके तयार करुन हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.