maharashtra

पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न


पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : पाटण, ता. पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार अज्ञात इसमांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दि. ३ जानेवारी रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास पाटण येथील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या बैल बाजार मार्गावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या पाठीमागील दरवाज्याच्या शटरचे चार अज्ञात इसमांनी कुलूप तोडून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आकाश सुभाष कानडे, रा. पाटण यांनी पोलीस ठाण्यात दिली.