महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान गणेश जिजाबा गुरव रा. म्हावशी, तालुका पाटण यांची पत्नी त्यांच्या गुरवाळ नावाच्या शिवारातील रस्त्यावर चालली असताना तेथीलच शंकर पांडुरंग गुरव, प्रशांत शंकर गुरव यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. याबाबतची फिर्याद पाटण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.