maharashtra

सात फूटी मगर असलेल्या नदीत एकजण बुडाला : शोधमोहीम सुरू


मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदीकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पाटण : मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदीकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
काशिनाथ केशव मोरे (वय-53, रा. ठोमसे, ता. पाटण) असे बुडलेल्या संशयिताचे नाव आहे. या नदीत काही दिवसापूर्वी सात फूटी मगर दिसली होती.
याबाबत घटनास्थळावरुन व मल्हारपेठ पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी, मंद्रुळहवेली येथील कोयना नदीकाठी ठोमसे येथील काशिनाथ मोरे हे तीन दिवसांपूर्वी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अंघोळ करण्यास गेले होते. तेव्हा पोहता पोहता ते बुडाले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यांना बुडताना पाहिल्याचे सांगितल्याने घटनास्थळी मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे हवलदार एन. के. कांबळे यानी धाव घेतली. या घटनेची माहिती घेवुन मोरे यांच्या कुटूंबियाना याबाबतची कल्पना देण्यात आली. कुटुंबियानी त्याचे कपडे, बूट आणि खिशातील आधारकार्ड पाहिले असता, बुडालेले गृहस्थ ठोमसेतीलच असल्याचे सिद्ध झाले. दरम्याण मंद्रुळहवेली येथील कोळी समाजातील युवकांनी नदीत तब्बल एक तास शोध घेतला असता त्यांच्या हाती काही लागले नाही. अखेर ट्रेकर्संनी कोयना नदीत शोध मोहिम राबवली आहे.