अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वाहनाने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चालकावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या दंशाचे प्रमाणही कमी आहे. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
चाफळ, ता. पाटण विभागातील सडावाघापूर येथील उलटा धबधबा प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन् उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.
पावसाने दडी मारल्यामुळे पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. काही विभागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने पेरणीसाठी घाई केलेल्या क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जून महिनाअखेरीस आला तरी पावसाचे आगमन झाले नाही, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
एसटी सेवा पूर्व पदावर आल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रवीण मारुती पाटील, शंकर तावरे यांच्या अथक परिश्रमानंतर पाडळोशी-परेल बससेवा सुरू करण्यात आली आहे.
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.
सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.