maharashtra

चव्हाणवाडीत लागलेल्या आगीत गंजी जळून खाक; पशुधनाचेही नुकसान


fire in Chavanwadi
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.

पाटण : चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
अथक परिश्रमानंतर नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. तसेच छपरात बाधलेली एक म्हैस होरपळून मृत्यू पावली. इतर गुरांना ग्रामस्थांनी दावी तोडून बाहेर काढल्याने इतर गुरे वाचवण्यात त्यांना यश आले. या आगीत प्रदीप चंद्रहार गोरे यांची ७० हजार किमतीची एक गाभण म्हैस होरपळून मृत्यू पावली असून वीस हजार रुपयांचे गवत जळून गेले. यामुळे या आगीत चाऱ्यासह पशुधनाचेही नुकसान झाले आहे.