maharashtra

एसटी सेवा पूर्वपदावर आल्यानंतर पाडळोशी-परेल बससेवा सुरू


Padloshi-Parel bus service resumes after ST service resumes
एसटी सेवा पूर्व पदावर आल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रवीण मारुती पाटील, शंकर तावरे यांच्या अथक परिश्रमानंतर पाडळोशी-परेल बससेवा सुरू करण्यात आली आहे.

चाफळ : एसटी सेवा पूर्व पदावर आल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रवीण मारुती पाटील, शंकर तावरे यांच्या अथक परिश्रमानंतर पाडळोशी-परेल बससेवा सुरू करण्यात आली आहे.
पाडळोशी हे गाव डोंगरराळ भागात वसलेले असून या गावच्या आजुबाजूस अनेक वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत. तसेच येथील मोठ्या संख्येने तरुण वर्ग हा उदानिर्वाहासाठी मुंबई व पुण्यामध्ये राहतो. अनेक वाड्या वस्त्या या डोंगर दऱ्या मध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासा अगोदर लहान मुले आणि गरोदर महिलांना कितेक तास घर लवकर सोडावे लागत असे. त्यातच गेल्या कोरोना कालखंडात आणि त्यानंतर एसटी महामंडळाच्या विविध मागण्यासाठी झालेल्या संपामुळे काही कालावधी लोटला गेला. पूर्वी दहा वर्षापूर्वी मुंबई गाडी होती. परंतु ती बंद केल्याने प्रवाशांना उंब्रज येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. पाडळोशी गावचे वारकरी क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार कै ह.भ.प .श्रीकांत सुतार त्यांच्या मुळे पाडळोशी येथे भरपूर एसटी फेऱ्या चालू झाल्या होत्या. परंतु त्यांच्या पच्छात भागातील एस्टी फेऱ्यांच पत्रक कोलमडले गेले. सेवा पूर्व पदावर आल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रवीण मारुती पाटील, शंकर तावरे यांच्या अथक परिश्रमानंतर पाडळोशी-परेल बससेवा ही सुरू करण्यात आली आहे. बस सेवा झाल्यामुळे बस चे पूजन श्री.विठ्ठलराव पाटील व श्री.शंकर तावरे टेलर यांच्या हस्ते चालक वाहक यांना शाल श्रीफळ देण्यात आले.या वेळी श्री.ज्ञानदेव पवार,श्री. दादासो सुतार,श्री.पांडुरंग तावरे व इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकर तावरे टेलर यांनी केले आहे.