maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा


वाहनाने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चालकावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : वाहनाने धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चालकावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 सप्टेंबर रोजी पाटण केरा पुलावर चिपळूण ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन राजू पाटील वय 50, रा. पाटण (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि चंद्रकांत चाळके राहणार वाजेगाव यांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. या अपघातात राजू पाटील यांचा मृत्यू झाला असल्याची खबर गिरीश दीपक खांडके वय 38, राहणार पाटण, तालुका पाटण यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.