maharashtra

आवसरी संघ ठरला ‘जानाई-भैरवनाथ चषक’चा मानकरी


Avsari Sangh became the standard bearer of 'Janai-Bhairavnath Cup'
बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.

पाटण : बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी यात्रेनिमीत्त जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब जाईचीवाडी (बोंद्री) यांच्या वतीने येथील तुळजाईसिटी मैदानावर दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून आवसरी संघ जानाई-भैरवनाथ चषकाचा मानकरी ठरला.
अंतिम सामन्यात जानाई देवी स्पोर्ट्स आवसरी संघाने शिवशक्ती आळी वाटोळे संघाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. हे बक्षीस कै. धुळाजी जानू यमकर याच्या स्मरणार्थ विठ्ठल रुक्मिणी मंडळ विठ्ठलनगर व जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स जाईचीवाडी यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस शिवशक्ती आळी वाटोळे संघाने पटकावले. हे बक्षीस गणेश फोटो फ्रेम (नारायण यदू मोहिते) व जानाई-भैरवनाथ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक मराठवाडी संघाने मिळविले. हे बक्षीस ग्रामपंचायत बोंद्री व शंभुराज युवा संघटना यांच्या वतीने देण्यात आले. मराठवाडी संघाचा लकी यादव यास मालिकाविर म्हणून तर आवसरी संघाचा शैलेश शिर्के यास सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे सर्व चषक कै. रुक्मिणी शंकर पवार यांच्या स्मरणार्थ अमोल पवार (मुंबई पोलिस) यांच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेत वनकुसवडे डोंगर पठारावरील सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकूण २२ संघांनी सहभाग घेतला होता.
विजेत्या प्रथम तीन संघांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. यावेळी फ्रेंड्स को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश शिंदे, पत्रकार संजय कांबळे, शंकरराव पवार, राम पवार, निळकंठ पवार, उपसरपंच विलास मोहिते, सदस्य संजय मोहिते, गोपाळ पवार, विकास मोहिते, गणेश शिर्के, तुकाराम पवार, मानसिंग बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत सुनिल पवार यांनी केले. तर संजय मोहिते यांनी आभार मानले.