माण तालुक्यातील संभाजी सावंत यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान
माणच्या मातीचा आणखी एक सन्मान
दुष्काळी माण ची ओळख बदलुन माण म्हणजे बुध्दीवंताची व प्रतिभावंताची खाण अशी नवी ओळख करुन देण्यात या मातीतील अनेक प्रतिभावंत प्रशासकीय अधिकारी व गुणवंत खेळांडुचे मोठे योगदान आहे. त्याच प्रतिभावंत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यादीत आता देवापुर नगरीच्या संभाजी सावंत या रांगड्या पण स्वभावाने अतिशय प्रेमळ अधिकाऱ्याचा समावेश झाला असुन
म्हसवड : दुष्काळी माण ची ओळख बदलुन माण म्हणजे बुध्दीवंताची व प्रतिभावंताची खाण अशी नवी ओळख करुन देण्यात या मातीतील अनेक प्रतिभावंत प्रशासकीय अधिकारी व गुणवंत खेळांडुचे मोठे योगदान आहे. त्याच प्रतिभावंत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यादीत आता देवापुर नगरीच्या संभाजी सावंत या रांगड्या पण स्वभावाने अतिशय प्रेमळ अधिकाऱ्याचा समावेश झाला असुन या बहाद्दर अधिकाऱ्याने पोलिस दलात आपले कर्तव्य बजावताना दाखवलेले साहस व बजावलेली सेवा यामुळे संपुर्ण पोलिस दलाची मान उंचावली आहे. त्यांच्या कर्तबगारीमुळेच त्यांना नुकतेच राष्ट्रपती पदकाने राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवामुळे माणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोलीस दलात उपअधिक्षक असलेले संभाजी सावंत माण तालुक्यातील देवापुर गावचे सुपुत्र व सध्या अक्कलकुवा उंच (जि.नंदुरबार) येथे सेवेत आहेत. त्यांच्या उत्कृष्ठ सेवाकार्यातील गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन त्यांना "राष्ट्रपती पोलीस पदक" राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई व गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संभाजी सावंत हे सन १९८९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्यांनी जळगाव, धुळे, नगर, नाशिक, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, PTC दौंड, तुरची, सोलापूर उत्यादी ठिकाणी त्यांनी राज्याच्या गृह खात्यात उत्कृष्ट अशी सेवा बजावली आहे.
त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत त्यांना यापुर्वी तिनशेहून अधिक बक्षिसे मिळाली आहेत तसेच २०१८ मध्ये त्यांना "माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह" ("Director General's Insignia") , सन २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानि करण्यात आले होते. त्यानी धुळे, जळगाव, सिंधुदुर्ग या ठिकाणी अनेक खून, दरोडे, घरफोडी च्या गुन्ह्याचा तपास यशस्विपणे केला आहे. नंदुरबार येथील सन २०११ मध्ये झालेल्या जातीय दंगल हाताळण्यात विशेष कामगीरी बजावली होती. नंदुरबार या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री यांचे उपस्थित व हस्ते नागरिकांना आधार कार्ड वाटप कार्यक्रम तसेच राष्ट्रपती यांच्या नंदुरबार दौरा प्रसंगी बंदोबस्त आखणी करण्यामध्ये अत्यंत मोलाची कामगीरी सावंत यांनी केली होती.
नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच तुरची, सोलापूर या ठिकाणी सेवेत कार्यरत असताना त्यांनी अत्यंत चांगले पोलीस प्रशिणार्थी घडविले म्हणून त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन गौरविण्यात आले होते. पोलीस दलामध्ये राहून जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपतींनी त्यांना २६ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल " राष्ट्रपती पोलीस पदक" जाहिर केले.
या पदकाचे वितरण दि. २१ मार्च रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते त्यांचा गौरव केला. माणदेशी संभाजी सावंत यांना राष्ट्रपतीपदकाने सन्मानित केले बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.