खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती
रस्त्यांचा विकास व रोजगार निर्मिती; युवकांच्या हाताला काम मिळाले
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
मारुती पवार
मायणी : पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
खटाव माण तालुक्यातील शेतकर्यांना हक्काचा साखर कारखाना असावा यासाठी सातारा जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षापूर्वी संकल्प केला. खटाव-माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकर घ्यावा लागतो. अशा दुष्काळी भागात साखर कारखाना उभा करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते.
या भागातील शेतकर्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी औद्योगिक प्रकल्प निर्माण होणे गरजेचे होते. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्याशिवाय औद्योगिक क्रांती होणार नाही. यासाठी सहकार्यांच्या मदतीने खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.सन 2019 साली पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू केला. पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू करताना अनेक अडचणी समोर आल्या यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन केले.
सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर ऊस शेती करत असलेले शेतकरी ऊस नोंदणी पासून ते ऊस तोडणीचे असंख्य प्रश्न समोर उभे असायचे ,म्हणून प्रथम कारखाना उभा केला. या भागातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावताना तालुक्याच्या हक्काच्या असलेल्या उरमोडी, जिहे-कठापूर ,टेंभू ,तारळी या उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून यातून रखडलेल्या योजना मार्गी लावल्या. आज खटाव -माण या दोन्ही तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाताना दिसत आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस शेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. आज एक दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र तयार झाले आहे.
खटाव-माण ऍग्रो कारखान्यामुळे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. तसेच या परिसरात असलेली मायणी,कातरखटाव, पडळ यासह धोंडेवाडी पळसगाव या गावामधील बाजारपेठेचा विस्तार वाढू लागला. अनेक युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंच होण्यास सुरवात झाली आहे. तर कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी मिळाली आहे. साखर कारखान्या बरोबरच इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील त्यामुळे एक औद्योगिक क्रांतीचा पायाच हा खटाव माण ऍग्रो साखर कारखाना होत आहे.
प्रभाकर घार्गे व मनोजदादा घोरपडे यांच्या दृष्टीतून उभा राहिलेल्या या साखर कारखान्यामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कातरखटाव वरून कलेढोणकडे जाणारा एकेरी मार्गाचे राज्य मार्गात रूपांतर करून हा एक चांगल्या दर्जाचा प्रमुख मार्ग निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. धोंडेवाडी गावापासून दगडवाडी चौक ते कारखान्यापर्यंत व मायणी माळीनगर, दगडवाडी, दातेवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर मायणी-अनफळे मार्गे पडळकडे जाणार्या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे या भागाचा दळणवळणाचा प्रश्नही या कारखान्यामुळे मार्गी लागला आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज दादा घोरपडे यांच्या दूरदृष्टीतून अनेक अडचणींवर मात करून उभा राहिलेल्या खटाव माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे खटाव माण तालुक्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळाली आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखान्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळालेल्या या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...