'शुगरग्रीड' मुळे माणदेशच्या विकासाला चालना
चंद्रतनय महाराज : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन समारंभ संपन्न..
शुगरग्रीड' या साखर कारखान्यामुळे माणदेशच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन समर्थ सद्गुरू चंद्रतनय महाराज यांनी केले.
मारुती पवार
मायणी : शुगरग्रीड' या साखर कारखान्यामुळे माणदेशच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन समर्थ सद्गुरू चंद्रतनय महाराज यांनी केले.
हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंगळी (ता. माण )येथे लवकरच शुगरग्रीड साखर कारखाना सुरू होत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर परम पूज्य चंद्रतनय महाराज यांच्या हस्ते आणि माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज छोटेखानी समारंभाद्वारे या कारखान्याचा भूमिपूजन समारंभ झाला. या प्रसंगी ते बोलत होते.
चंद्रतनय महाराज म्हणाले, की संघर्ष आणि तपातून रणजितसिंह देशमुख यांचे नेतृत्व तावून-सुलाखून पुढे जात आहे. यातून जोडीला अनुभवही आहे. खटाव-माण सारख्या दुष्काळी भागात त्यांनी दोन सूतगिरण्या यशस्वीपणे चालवून लोकांच्या मनात संस्थात्मक - रचनात्मक काम करणारा माणूस, अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. आता पिंगळी च्या माळावर त्यांनी साखर कारखाना उभा करण्याचा संकल्प सोडला आहे. येणाऱ्या वर्ष-दोन वर्षात तो कारखाना प्रत्यक्षात उभा राहील. या परिसराचे लवकरच नंदनवन झालेले दिसेल, त्याशिवाय या परिसराच्या आर्थिक परिवर्तनालाही या कारखान्याचा मोठा हातभार लागेल. त्यांच्या या विधायक आणि उभारणीच्या कामाला माझ्या सदिच्छांचे पाठबळ सदैव राहील.
'शुगर ग्रीड 'ग्रुपचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले, की या परिसरात साखर कारखाना उभा राहावा यासाठी मी गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रयत्नात आहे. दोन सूत गिरण्यांच्या यशस्वी उभारणीनंतर साखर कारखान्याच्या उभारणीच्या मार्गातील सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मध्यंतरी करोना महामारीमुळे या कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याला विलंब झाला. आता लवकरच यंत्रसामग्री येऊन या परिसरात हा कारखाना सुरू होईल. या कारखान्याच्या उभारणीमुळे माण - खटावच्या विकासाला निश्चितच हातभार लागेल.
प्रदेश काँग्रेसचे चिटणीस राजेंद्र शेलार म्हणाले, माण- खटाव चा एकुणच विकासाचा इतिहास पाहिला, तर या तालुक्यात औद्योगिक पर्व सुरू करण्याचे श्रेय निर्विवादपणे रणजीत देशमुख यांना द्यावे लागेल. दोन सूतगिरण्याप्रमाणेच नव्याने उभा राहत असलेला हा साखर कारखाना साखर उद्योगात मानदंड उभा करेल.
या प्रसंगी भूमिपूजन समारंभाचे पौरोहित्य वरुडचे बाळासाहेब आणि चित्तरंजन खटावकर यांनी केले. रणजित देशमुख, सौ. राजेश्वरी देशमुख, मोहनराव देशमुख, विक्रम देशमुख यांनी श्री. चंद्रतनय महाराज यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा दूध संघाचे संचालक राजूभाई मुलाणी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे खजिनदार बाबासाहेब कदम, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाबुराव शिंदे, जिल्हा सरचिटणीस एम.के .भोसले, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोकराव गोडसे, रणधीर जाधव, खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ.महेश गुरव, माण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, युवक काँग्रेसचे दयानंद भोसले, डॉ.निलेश जाधव, अनिल बडवे, परेश जाधव, सत्यवान कांबळे, धर्मराज जगदाळे, प्रा. बापूराव देवकर, संजयशेठ शितोळे, तानाजीशेठ बागल, ऍड. संदीप सजगणे, प्रा. पांडुरंग खाडे, सत्यवान कमाने, भरतशेठ जाधव, निलेश घार्गे, रवींद्र शिंदे, विकास साबळे, वैभव इनामदार, मुबारक मुल्ला, डॉ. संतोष गोडसे, ऍड. पी. डी. सावंत, प्रा. दिलीपराव डोईफोडे, डॉ. बाळासाहेब झेंडे, डॉ. निलेश जाधव, बाळासाहेब पाटील, सदाशिव खाडे, दाऊदखान मुल्ला, भगवंतराव पाटील, टिल्लू बागवान, रामभाऊ दडस, सुरेश लंगडे, सोमेश्वर जंगम आदी उपस्थित होते.