Maan

esahas.com

माणचे प्रशासन कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करतेय?

माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला

esahas.com

डॉ. विश्‍वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम ठेवला

‘म्हसवडसाठी कदम व जगताप कुटुंबीयांचे खास नातं आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे म्हसवड शहर व येथील जनतेवर खूपच प्रेम होते. डॉ. विश्‍वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम पुढे चालू ठेवलेला आहे व तो कायम राहणार आहे. गरीब सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आमचे ट्रस्ट कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अडकलेल्या जनतेला मदतीचा हात देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्यविषयक साहित्य हे सामान्य रुग्णांसाठी उपयोगी पडेल याची खात्री आहे. गरज पडल्यास अजूनही मदत करू,’ अशी ग्वाही भारती हॉस्पिटलचा कार्यकारी संचालक डॉ. अ

esahas.com

जनतेचा जीवासाठी माण पंचायत समितीचा धाडसी निर्णय

माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.

esahas.com

सागर जाधव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल ‘भक्ती रिसर्च’ सेंटरकडून गौरव

शिक्षक म्हणजे ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव आहे. या उदात्त हेतूने प्रत्येक शिक्षकाला दैवत मानून भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी नं. 1 शाळेचे उपक्रमशील शिक्षक सागर जाधव यांचा प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

esahas.com

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रुग्णालय कोविडसाठी हस्तांतरित

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.

esahas.com

‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने इंद्रायणी जवळ-मस्के यांचा सन्मान

सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. 

esahas.com

आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची

‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.

esahas.com

म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळेना 

म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. 

esahas.com

शेतकर्‍यांच्या जिद्दीनेच आंब्याची निर्यात वाढली

‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

esahas.com

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.