sports

आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची

डॉ. प्रमोद गावडे : म्हसवड येथे महावीर जयंती साजरी

‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.

कुकुडवाड : ‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.

म्हसवड येथे जैन धर्मगुरू भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ग्रामीण दुष्काळी भागातील गरजू मोलमजुरी करणार्‍या महिलांना कोरोनाच्या संकटामुळे रोजगार मिळत नाही, अशा महिलाना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.

या कार्यक्रमास म्हसवडचे नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, डॉ. राजेश शाह, डॉ. विलास सावंत, दत्ता शेंबडे, सचिन दशमाने, जितूभाई गांधी, संतोष दोशी, डॉ. भोसले, प्रशांत दोशी, महावीर व्होरा, प्रीतम शाह, राजकुमार गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.