sports

‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने इंद्रायणी जवळ-मस्के यांचा सन्मान


सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. 

दहिवडी : सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. 

भक्ती फाउंडेशन ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर गेले अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करून प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. विविध शाळा, गरीब कुटुंबातील हुशार मुले दत्तक घेऊन त्यांना जीवनामध्ये मदत करण्याचे कार्य करीत आहे.

इंद्रायणी जवळ-मस्के यांनी आपल्या गोड वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात वक्तृत्व स्पर्धेत विजयी होऊन विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देऊन समाजप्रबोधन करून प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अमूल्य कामगिरी केल्याबद्दल हा सन्मान केला. त्यांचा 23 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे वक्तृत्व, निबंध, प्रश्‍नमंजुषा, बालनाट्य, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले आहेत. तसेच जो जे वांछील तो ते लाहो, गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ, जगायचं कशासाठी?, शेतकरी राजा जागा हो, मला जगायचंय, महिला सबलीकरण आदी विषयांवर व्याख्याने देऊन सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदिका म्हणून त्या नावाजलेल्या आहेत, स्वच्छ गोड मंजूळ आवाजातून निवेदन करताना विविध कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा मोठा अन् मोलाचा सहभाग असतो.

इंद्रायणी जवळ-मस्के यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.