Maan

esahas.com

शेंडगेवाडीत गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून पाहणी

बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या 22 किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केली.

esahas.com

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे म्हसवडकरांची धडधड वाढली

कोरोना या महामारीची दहशत गेल्या वर्षी पासून माण तालुका भोगत आहे. गत मार्चमध्ये म्हसवड व परिसरात कोरोनाची मोठी दहशत होती.आठ महिने म्हसवड व परिसरातील नागरिकांनी या महामारीची दहशत मनावर घेत 35 लोकांचे जीव घेतल्यानंतर या महामारीने आपला मोर्चा दहिवडी व परिसराकडे वळवला. दहिवडीत म्हसवड पेक्षा मोठी दहशत होती. या दहशतीने दहिवडीत  डोकेवर काढल्याने माण तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूच्या संख्येने शतक पार करून 141 आकडा गाठला असताना पुन्हा या कोरोनाने दुसर्‍या लाटेत आपला मोर्चा म्हसवडकडे वळवून म्हसवडकरांची झो

esahas.com

हस्तनपूरच्या उजाड माळरानावर वनविभागाने फुलवली वनराई..!

हस्तनपूर (ता. माण) येथील 50 हेक्टर उजाड माळरानावर वनविभाग दहिवडी यांनी विविध प्रकारची 31250 वृक्ष लावून त्यांना चार टँकरने नियमित पाणी देऊन वनराई फुलवली आहे. या वनराईसाठी हस्तनपूर ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य वनविभागाला मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात वनराई हिरवीगार दिसून येत आहे.

esahas.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांना हक्क मिळवून देणारे ‘घटनापती’

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित, बौद्धांचे नेते असून त्यांनी फक्त दलितांसाठी काम केले, हा जो इतर धर्मियांमध्ये गैरसमज आहे तो आज 74 वर्षे झाली तरी फुसला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. खरेतर या महामानवाने पृथ्वी तलावर असलेल्या अठरापगड जाती जमातीच्या पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार महिला पुरुष यांचे हक्क घटनेच्या माध्यमातून मिळवून देणारे जगातील एकमेव घटनापती आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही,’ असे मत पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केले.

esahas.com

दुष्काळी माण तालुक्यातील केसर आंबा निघाला दुबईस..

दुष्काळी माण तालुक्यातील खडकी येथील हरिभाऊ व प्रमोद वेदपाठक या शेतकरी बंधूंनी शासकीय अनुदान योजनेतून लागवड केलेल्या आंबा फळ बागेतील दहा टन केसर आंबा दुबईस विक्रीसाठी निर्यात करण्यात आला.

esahas.com

माण तालुक्यातही अवकाळी पावसाचा दणका

उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून, रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला आहे.

esahas.com

शासनाच्या सूचनांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी

कोविडच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन भीम अनुयायी यांनी करून वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच मिरवणूक, फेरी एकत्र जमण्यास बंदी असल्याने कोणी ही या नियमाचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन उत्साहाचा व आनंदाचा हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन  एपीआय बाजीराव ढेकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत केले. 

esahas.com

माणदेशी शेतकरी कांद्याचे भाव घसरल्याने हवालदिल

माण तालुक्यात शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून कांद्याला ओळखले जाते. शासनाने नुकताच मिनी लॉकडाऊन जाहीर केला अन् शेतकर्‍यांनी मार्केटला कांदा विक्रीसाठी आणला. या कांद्याची अचानक आवक वाढल्याने कांद्याचा भाव घसरला असल्याने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या एक हजाराच्या आत भाव आला असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे.

esahas.com

आंधळी धरण व राणंद मध्यम प्रकल्पात 55 टक्क्यांवर पाणीसाठा शिल्लक

माण तालुक्यात यावर्षी पावसाची कृपादृष्टी चांगली झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा समाधानकारक आहे. परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. यंदा कोरोना आणि मिनी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. तसेच माण तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी टिकून असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली आहेत. दहिवडी व गोंदवलेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा आ

esahas.com

श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीच्या चरणी कडधान्याची आरास

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी मंदिरातील दर रविवारची पूजा ही नाथ भक्तांना पर्वणी ठरत असून, या दीड वर्षातील प्रत्येक रविवारी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी भक्तांच्या वतीने व सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पक बुद्धीने पूजा केली जाते.