sports

शासनाच्या सूचनांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी

सपोनि बाजीराव ढेकळे यांचे आवाहन; म्हसवड येथे जयंतीसंदर्भात बैठक संपन्न

कोविडच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन भीम अनुयायी यांनी करून वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच मिरवणूक, फेरी एकत्र जमण्यास बंदी असल्याने कोणी ही या नियमाचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन उत्साहाचा व आनंदाचा हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन  एपीआय बाजीराव ढेकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत केले. 

म्हसवड : कोविडच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन भीम अनुयायी यांनी करून वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच मिरवणूक, फेरी एकत्र जमण्यास बंदी असल्याने कोणी ही या नियमाचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन उत्साहाचा व आनंदाचा हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन एपीआय बाजीराव ढेकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत केले. 

सोमवारी सकाळी 11 वाजता म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर प्रेमींच्या आयोजित बैठकीत बाजीराव ढेकळे यांनी सर्व जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकार्‍यांच्याशी विस्तृत चर्चा व मार्गदर्शन करून विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात माहिती व सूचना दिल्या. 

कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून रक्तदान शिबिरे व आरोग्य शिबिर असे समाजोपयोगी उपक्रम  सोशल डिस्टन्स राखून राबविण्याचे आवाहन यावेळी सपोनि ढेकळे यांनी केले. 

यावेळी कुमार सरतापे, प्रमोद लोखंडे, महेश लोखंडे, सयाजी लोखंडे, अंगुली बनसोडे, रणजित सरतापे, सचिन सरतापे, सचिन वाघमारेंसह पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकर प्रेमींसह पोलीस पाटील उपस्थित होते.