एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने दुसरे स्थान पटकाविले. ई गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये किर्गी प्रजासत्ताकचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत गोलफलक कोरा राहिल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.
फुजेरा : एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने दुसरे स्थान पटकाविले. ई गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये किर्गी प्रजासत्ताकचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत गोलफलक कोरा राहिल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.
पात्र फेरीच्या स्पर्धेतील इ गटात भारत-किर्गी प्रजासत्ताक यांनी समान 4 गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली. गोलकोंडी कायम राहिल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 4-2 असा विजय नोंदवला. त्यात के.पी. राहुल, रोहित दानू, सुरेश सिंग आणि रहीम यांनी गोल नोंदविले. भारतीय संघाचा गोलरक्षक धीरज सिंगने प्रतिस्पर्ध्यांचे दोन फटके थोपविले. ई गटात संयुक्त अरब अमिरातने पहिले स्थान मिळविले. संयुक्त अरब अमिरातने या गटातील झालेल्या सामन्यात ओमानचा 2-0 असा पराभव केला. पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत प्रत्येक गटातील आघाडीचे संघ थेट प्रवेश करतील.