sports

माण तालुक्यातही अवकाळी पावसाचा दणका

कांदा, डाळिंबसह अन्य पिकांचे नुकसान

उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून, रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला आहे.

बिदाल : उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून, रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला आहे.

ढगाळ वातावरणासह विजेचा कडकडाट सुरू आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे आंबा, मका, कांदा, डाळिंब, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसानंतर आता पुन्हा जोरदार अवकाळी पावसासह गारपीट सुरू आहे.

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांतील शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान झाले आहे.